वरळी मतदारसंघात होर्डिंग लावून युवासेनेची कोविड १९ विरुद्ध माहितीची जनजागृती मोहीम सुरू!

वरळी मतदारसंघात होर्डिंग लावून युवासेनेची कोविड १९ विरुद्ध माहितीची जनजागृती मोहीम सुरू!

       वरळी विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच आकर्षणाचा मतदारसंघ आहे. आणि आता वरळी विधान सभेचे आमदार श्री. आदित्य ठाकरे असल्याने वरळी विधान सभा मतदार संघाकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष असत.

         करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुन्हा एकदा "माझे कुटुंब माझी जबाबदारी." ह्या संदर्भात वरळी विधान सभेचे आमदार, पर्यावरण, पर्यटन, राज्यशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार कोविड १९ विरुद्ध लढण्यासाठी सुविधा असलेल्या, माहितीचे होर्डिंग लावून वरळी मतदारसंघात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.

           आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना वरळी विधानसभा टीम सज्ज झाली आहे. तुम्ही सावधानी बाळगा आपणास काहीही मदत लागल्यास आम्ही नेहमी कधीही तत्पर आहोत, तुमची सर्वांची काळजी घेण्यास कटीबद्धआहोत! असे युवा विभाग अधिकारी संकेत विश्राम सावंत व युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week