
मुंब्रा ते मुंबई थेट बससेवा सुरु !!
ठाणे - कल्याण फाटा ते सीएसएमटी मुंबई या मार्गावर धावणाऱ्या एसी बस सेवेला गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
कल्याण फाटा, उत्तरशीव, शीळ फाटा, भोलेनाथ नगर येथील नागरिक, नगरसेवक बाबाजी पाटील, शीळ विभागाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष गणेश मुंडे यांच्या मागणीनंतर ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांनी या मार्गावर बस सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीमध्ये ठेवला त्यानंतर या मार्गावर बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शमीम खान म्हणाले, कल्याण फाटा, उत्तरशीव शीळ फाटा, भोलेनाथ नगर मुंब्रा, कौसा परिसर च्या नागरिकांना मुंबई जाण्या येण्यासाठी या माध्यमातून चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. ही बस मुंब्रा कौसा मधील प्रत्येक थांब्यावर थांबेल.
कल्याण फाटा येथील दत्त मंदिर येथून दररोज दोन वेळा सकाळी साडेआठ वाजता व सायंकाळी चार वाजता ही बस मुंबईसाठी सुटेल तर मुंबई सीएसटी येथून सकाळी साडे अकरा वाजता व सायंकाळी सात वाजता ही बस सुटेल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद अली अश्रफ, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण, ठाणे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, ठाणे परिवहन समितीचे सदस्य मोहसिन शेख, नगरसेवक हिरा पाटील, नगरसेविका सुनीता सातपुते, फरजाना शाकिर शेख, इब्राहिम राऊत, इम्रान सुर्मे, मुमताज शाह, जावेद शेख, शोएब खान, युनूस शेख, मुफ्ती अश्रफ, पल्लवी जगताप, मेहफुज़ मामा, साबिया मेमन, सेहर युनूस शेख, इश्रत शेख, पूजा खान, वनिता भोर, मिनाज शेख उपस्थित होते.
नगरसेवक बाबाजी पाटील, गणेश मुंडे यांनी यावेळी गृह निर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड व परिवहन सदस्य शमीम खान यांचे आभार मानले.