
कायमस्वरुपी रुग्णालये हवीत !!
करोनाच्या दुसऱ्या लाटेनी सर्वत्र हाहाकार निर्माण झाला आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. मृत्यदर वाढत आहेत. अशा परिस्थितीत कोविड रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. त्याबद्दल महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगर पालिका, सामाजिक संस्था यांना धन्यवाद. तरी या पुढे महाराष्ट्र सरकार ने कायम स्वरुपी रुग्णालये निर्माण करणे आवश्यक आहे. मागील ७३ वर्षात मुंबई मध्ये के इ एम, जे जे, लोकमान्य टिळक रुग्णालय (सायन), नायर, कस्तुरबा इ, अशी सहा रुग्णालये, आरोग्य केंद्र, आणि २८ प्रसूती गृह आहेत. ही आता अपुरी पडत आहेत. मुंबईची लोकसंख्या १९४७ साली ३० लाख ४० हजार २७० तर २०२० साली २ कोटी ४१ लाख १० हजार अशी लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा अत्यंत अपुरी पडत आहे. आणि याकरीता मुंबई मध्ये दिल्लीत असलेल्या एम्स सारखे सर्व सुविधा युक्त रुग्णालय तयार करणे आवश्यक आहे. याकरीता केंद्र सरकारने परवानगी ही दिली आहे. तरी मुंबई महानगर पालिका आणि महाराष्ट्र सरकार तर्फे वरळी येथील वरळी डेरी बंद असलेल्या १४ एकर भूभागावर पर्यटन मंत्रालय तर्फे पर्यटन संकुल आणि मत्सालय करीता महाराष्ट्र सरकारच्या अर्थ संकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तरी मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करता, मत्सालय, पर्यटन संकुल बरोबर अत्याधूनिक व बहुमजली रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय असणे आवश्यक आहे. यामुळे डॉ, नर्सेस, आरोग्य कर्मचारी इ पदे निर्माण होतील. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वरळीचे आमदार, पर्यावरण व राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होऊ शकेल.