
दहशतवाद आणि सामाजिक सुरक्षा !!
पूर्विची युद्ध ही समोरासमोर खेळली जायची; त्यामुळे नुकसानीची तिव्रता ही मर्यादित होती. आजच्या संघटित गुन्हेगारीमुळे, अतिरेकी विचारसरणीमुळे, आणि समाजविघातक घटकामुळे सध्यस्थितीत भितीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातच नैसर्गिक आपत्ती किंवा मानव निर्मित आपत्तीशी सामना करण्याची आपली क्षमता! आपला भारत देश तर दहशतवादाच्या समस्येला सातत्याने सामोरे जात आहे.
सामाजिक सुरक्षा ही आपल्या घरापासुन होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरात दक्ष राहून कान आणि डोळे शाबूत ठेऊन समाजविघातक घटकांकडून जातीयवाद-प्रांतवाद यामुळे वादविवाद कलह निर्माण होणार नाही. समाजविरोधी घटना घडून देशाची अखंडता भंग पावणार नाही. जेणेकरून वित्तहानी-मनुष्यहानी न होता. सुखशांती, सलोखा प्रस्थापित करण्यासाठी जनजागृती निर्माण करणे काळाची गरज आहे.
एकमेकांचा आदर करणे, प्रतिसाद देणे, समन्वय साधणे, विचारांची देवाण-घेवाण करणे, संवाद साधणे, चर्चा करणे त्यातून प्रश्नाची सोडवणूक होऊन सामाजिक सुरक्षितता वाढेल. ज्याप्रमाणे दो-यामध्ये फुले गुंफली जातात, त्यातून सुंदर सुबक गजरा निर्माण होतो. तशी गुंफण समाजात होणे अपेक्षित आहे. यातूनच आपल्या समाजाची आणि देशाची प्रगती होईल.
सुनिल गोपाळ पांचाळ