
वर्दितला माणूस मुंबई पोलीस !
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय: सदैव तत्पर
मुंबई पोलिस म्हटलं की समोर उभा राहतो तो उंच, धिप्पाड, सावळ्या वर्णाचा, मजबूत बांध्याचा, जाड मिशांचा आणि राकट आवाज आवाज असणारे अतुलनीय व्यक्तीमत्व.
मुंबई पोलिसांची तुलना स्काॅटलैंड यार्डच्या पोलिसांबरोबर केली जाते याचं कारण म्हणजे मुंबई पोलिस दलाचे अतुलनीय धैर्य, धाडस, गुन्हेगारांना जेरीस आणण्यासाठी त्यांना पकडण्यासाठी रचला जाणारा सापळा, कुठल्याही गुन्ह्याची लवकरात लवकर उकल काढून गुन्हेगारांना शासन करण्यासाठी रचलेली सुरक्षित नियोजनबध्द व्युहरचना, नागरिकांचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपल्या जीवाची पर्वा न करता करण्यात येणारे संरक्षण.
मुंबई पोलिस हा मुंबईचा अविभाज्य घटक आहे. ते नसतील तर सर्वच असुरक्षित आणि ते असतील तर सर्वच सुरक्षित हे समीकरण फार जुळते. तरीपण सर्वसामान्य माणूस त्यांच्याशी बोलणं, चांगले संबंध ठेवणे नेहमीच टाळत आला आहे. संकटप्रसंगी त्यांच्याकडे जायला, बोलायला घाबरतो असं का ? उलट संकटप्रसंगी पोलिस सोडून सर्वांचे दरवाजे आपल्याला बंदच मिळतात. जनसामान्यांत एक म्हण रोजच ऐकायला मिळते ती म्हणजे " पुलिस से ना दोस्ती अच्छी ना दुष्मनी "..पण एकदा तरी कोणी मुंबई पोलिसांबरोबर मनापासून, अगदी खरीखुरी दोस्ती केली आहे का ? आणि याचं ऊत्तर जर नाही असेल तर पोलिसांबरोबर केलेल्या दोस्तीचा अनुभव आपल्याला कसा येणार हा पण एक गहन प्रश्न आहे.
मुंबई पोलिसांचं ब्रीदवाक्य म्हणजे " सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " म्हणजेच ईंग्रजीतून " PROTECT TO GOOD & DISTROY TO DEMAN " याचाच अर्थ असा की " सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा नाश " असे होय.आणि हे ब्रीदवाक्यच पोलिसांबद्दल सर्व काही सांगून जाते.
मुंबई पोलिस ऑन ड्युटी २४ तास सतर्कतेने काम करत असतात. मुंबईच्या म्हणजेच मुंबापुरीच्या संरक्षणासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस हे नेहमीच तत्पर असतात. पोलिसांचं वागणं फार कठीण असते पण ते गुन्हेगारांसाठी, गुन्हा रोखण्यासाठी आणि त्यांना तसं रहावचं लागतं नाहीतर आपली ही मुंबई सुरक्षित रहाणार नाही.अराजकता माजेल ,गुन्हेगारी फोफावेल, नागरिक ,महिला, युवती ,लहान मुले असुरक्षित होतील.
मुंबई पोलिस हे चांगल्या माणसासाठी नेहमी चांगलेच असतात. रस्त्यावर मधोमध पार्क केलेली बाईक स्वत: दुसर्या सुरक्षित ठिकाणी पार्क करणारे मुंबई पोलिस, अंध व्यक्तीला हात पकडून तसेच लहान मुलांचं बोट पकडून रस्ता पार करून देणारा मुंबई पोलिस, महिलांना, युवतींनी एका थोरल्या भावाप्रमाणे वागणूक देणारा मुंबई पोलिस रोज ह्या ना त्या ठिकाणी नजरेस पडतात.
कायद्याचे पालन करताना कोणाशी कठोर वागले असता काही लोकं मुंबई पोलिसांना शिव्या देतात पण मुंबई पोलिसांना शिव्या देणे खुप सोपं असतं पण त्यांच्यासारखी ड्युटी करणे फारच कठीण आहे हे सर्वांना समजायला हवे न्हवे गरजेचं आहे ते..
कधी मुंबई पोलिसांचा विचार कोणी केला आहे का ? त्यांची लाईफस्टाईल जवळून कोणी बघीतली आहे का ? त्यांच्या घरात कमावणारा एक माणूस आणि खाणारे आठ अशी परिस्थिती असते. त्यांच्या मुलांना रोज वाटते बाबांनी आपल्याबरोबर रहावं , बोलावं, फिरायला न्यावं, लाड करावे.
पोलिसांना पण मन असते त्यांना पण वाटते की आपण आपल्या बायका पोरांबरोबर सण साजरा करावा, मुलाबायकांबरोबर फिरायला जावे पण मुंबई पोलिस आपलं मन मारून ह्या सर्व गोष्टी टाळतात आणि डोळ्यासमोर ठेवतात तो फक्त एकच ध्यास तो म्हणजे ह्या मुंबापुरीचे म्हणजेच मुंबईचे व ह्या मुंबईत रहाणार्या मुंबईकरांचे २४ तास संरक्षण. म्हणूनच आपण सर्व ह्या जिगरबाज मुंबई पोलिसांचे म्हणजेच वर्दितल्या माणसाचे ॠणी आहोत . त्याचप्रमाणे मुंबई पोलिस ऑन ड्युटी २४ तास करत असलेल्या निस्वार्थ कार्याची आपण समस्त मुंबईकरांनी जाण ठेवली पाहिजे. त्यांच्याशी समन्वय साधला पाहिजे कारण मुंबई पोलिस आपल्या संरक्षणाचा भार ऑन ड्युटी २४ तास वाहतात हे लक्षात ठेवले पाहिजे.
========================
भुषण प्र. कुंडईकर