
मराठी भाषा संवर्धन मराठी वाचा, बोला, लिहा !
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेबद्दलची जाणीव व जागृती व्हावी यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन शासनातर्फे करावे लागते.
एकविसाव्या प्रगतशील शर्यतीच्या युगामध्ये आपणा सर्वाना महाराष्ट्टाच्या सुसंस्कृत परंपरांचा विसर पडत चालला आहे. ३१ डिसेंबर साजरा करण्याच्या नादात आपण मराठी नुतन वर्षाचा पहिला दिवस "गुढीपाडवा" मात्र विसरत चाललो आहोत. या पवित्र सणाचे महात्म्य जपण्याचे सोडून पाश्यात संस्कृती अगंवळणी करून घेतल्यामुळे मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यव-त करण्यासाठी पंधरवढा साजरा करण्याचे आवाहन करावे लागते, हि नव-कीच लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.
।। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।
कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्या मराठमोळ्या जनतेला हे आवाहन करणे कितपत योग्य?
किती मराठी शासकीय/अशासकीय अधिकारी-कर्मचारी, राज्यकर्ते, भुमिपुत्र, महाराष्ट्टातील सामान्य जनता मराठी मायबोलीचा वापर करते. आपली स्वाक्षरी मराठीतून करते? मराठी टिकविण्यासाठी आजपासून सर्व मराठी बांधवानी आपली स्वाक्षरी मराठीतून करून आपले मराठीपण जपले तरी मराठी भाषा संवर्धन साठीचे आपल्यातर्फे पहिले पाऊल ठरेल.
--- सुनिल गोपाळ पांचाळ ---