टर्मिनल २ वर भारतीय कामगार सेनेतर्फे बाळासाहेबांची जयंती साजरी !

टर्मिनल २ वर भारतीय कामगार सेनेतर्फे बाळासाहेबांची जयंती साजरी !

       भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने अतिशय मोठ्या प्रमाणात व जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल २ येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ वी जयंती निमित्ताने आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेते गजानन किर्तीकर, महाराष्ट्राचे परिवहन व संसदीय कामकाज मंत्री एड. अनिल परब, युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुधार समिती अध्यक्ष सदा परब आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

       तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी विमानतळावरील असंख्य कामगार दाखल झाले होते. तसेच विमानतळ परिसरातील विविध नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या सदस्यांनी देखील बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी हजेरी लावली. सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

      याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सहचिटणीस सुर्यकांत पाटील, राजा ठाणगे, जगदीश निकम, मिलिंद तावडे, विजय शिर्के, संजीव राऊत, कार्यकारिणी सदस्य निलेश ठाणगे, बाबा शिर्के, पोपट बेदरकर व इतर कमिटी सदस्य आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर

Most Popular News of this Week