
दर्शनाला सवलत द्यावी !
कारोना महामारीच्या लॉकडाऊन व संचारबंदी मध्ये सर्व धर्मियांचे सण घरातूनच साजरे करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात येऊन सर्व व्यवहार शासकिय नियम पाळून सुरळीत होत आहेत. भाविकांच्या मर्यादित संख्येने धार्मिक स्थळे दर्शनाला खुली झाली आहेत. ३१ डिसेंबर च्या रात्री नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. तरी नवं वर्षाचा १ जानेवारी २०२१ शुक्रवार शुभ दिवस असून वर्षाचा पहिला दिवस म्हणून सिद्धिविनायक गणपती, शिर्डीचे साईबाबा, महालक्ष्मी देवीचे लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेऊन नवं वर्षाच्या कार्याची देव दर्शनाने शुभारंभ करीत असतात. त्यामुळे नव वर्षाच्या स्वागता निमित्त देव देवतांचे दर्शन घेण्याकरीता काही प्रमाणात मंदिरा मध्ये भाविकांना (शासकीय नियम पाळून) दर्शनाचा लाभ / प्रवेश मिळ्यासाठी सवलत द्यावी अशी जाहीर मागणी भाविकांच्या वतीने जेष्ठ पत्रकार विजय ना कदम यांनी केली आहे.