क्लस्टर योजनेबाबत लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन नागरिकांना समजावण्याची गरज - नजीब मुल्ला !
क्लस्टर योजनेबाबत लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन नागरिकांना समजावण्याची गरज - नजीब मुल्ला !
ठाणे क्लस्टर योजना अत्यंत चांगली योजना आहे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे महापालिकेतील गटनेते नजीब मुल्ला यांनी केले आहे. क्लस्टर मध्ये जमीन मालकी बाबत पालिका आयुक्तांना मोठे अधिकार आहेत. प्रत्येक घर मालकाला किमान 323 चौरस फूटाचे घर मिळेल महत्त्वाचे म्हणजे यामध्ये घर मिळण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही, असे नजीब मुल्ला यांनी स्पष्ट केले.
यामध्ये अनधिकृत इमारती, चाळी यांना देखील लाभ मिळणार आहे. ज्या अधिकृत इमारती असतील त्यांना 25 टक्के विनामुल्य अतिरिक्त जागा मिळेल,
क्लस्टरमध्ये सुरुवातीला घर मालकी हक्काने देण्यात येणार नव्हते त्यामध्ये सुधारणा करुन घेण्यात आली त्यामुळे आता मालकी हक्काने घर मिळणार आहे. क्लस्टरबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज पसरले आहेत त्यामुळे नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी व क्लस्टर बाबत शास्त्रशुध्द माहिती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची व नागरिकांना परिपूर्ण माहिती देण्याची गरज असल्याचे मत नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती, तज्ञ व्यक्तींनी पुढे येऊन क्लस्टर बाबत जनजागृती करण्याची व सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
क्लस्टर मध्ये राजकारण न करता राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे तर आपण नागरिकांना या चांगल्या योजनेद्वारे घरे देऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, नागरिकांनी केवळ इतरांवर अवलंबून न राहता आपल्या हक्काच्या घरासाठी पुढे येण्याची गरज आहे. कळवा मुंब्रा मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन नागरिकांना समजावून सांगावे जेणेकरुन त्यांना याबाबत माहिती मिळेल.
क्लस्टर योजना बिल्डर साठी नाही तर नागरिकांच्या हितासाठी आहे हे जाणण्याची खरी गरज आहे.