
सुरक्षितता हवी !
मुंबई महानगपालिकेच्या के इ एम रुग्णालयामध्ये सर्व देशभरातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. त्याचप्रमाणे बाह्य रूग्णांकरीता किरकोळ, लहान सहान आजाराच्या औषधोपचारासाठी हजारो रुग्ण, नातेवाईक येत आहेत. अशा सर्वांसाठी रुग्णालयाच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारची तपासणी न होता प्रवेश मिळतो.
तरी आता दिवाळी नंतर करोना रुग्णांची संख्या वाढत असताना करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत इतर आजारांच्या रुग्णांमध्ये व सर्व सामान्य नागरिकांमध्ये करोना संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. (रुग्णालयामध्ये करोना पेशंट चे वेगळे वार्ड आहेत)
रुग्णालयामध्ये कोणालाही प्रवेश देताना तापमान तपासणी, आणि सॅनिटायझरची सुरक्षतेकरीता सोय करण्याची आवश्यकता आहे.