
सीमा प्रश्न आणि अंतुले !!
महाराष्ट्र, कर्नाटक सीमा वादावरून कर्नाटकातील मुख्यमंत्री भडक भाषणे करून वातावरण तापवत आहेत. महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नासाठी समिती स्थापन केली असून, समिती बेळगांव मध्ये जाणार आहे. त्यामूळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका असे सांगत आहेत. तत्पूर्वी सीमा प्रश्न संबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तरी कर्नाटकच्या राज्य सरकारने होणारी कन्नड भाषेची सक्ती, कानडी भाषेचे प्रयोग, मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी, त्यामूळे केंद्र सरकारने १९६६ मध्ये महाजन आयोग स्थापन केला. या आयोगाने मराठी भाषिकांवर अन्याय केला. या आयोगाची चिरफाड करण्याकरिता मा मुख्यमंत्री बॅ ए आर अंतुले यांनी महाजन रिपोर्ट अनकव्हर्ड हे पुस्तक ३ जानेवारी १९६८ रोजी लिहिले आहे. हे पुस्तक सीमा प्रश्न लढ्यात कायम स्वरुपी मार्गदर्शन करणार असून, यथायोग्य उपयोग करून हा लढा विजयी करायचा आहे.