रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ 1 ऑक्टोबर पासून लागू, रिक्षा दोन रुपये, टॅक्सी तीन रुपये व कुल कॅब सात रुपये भाडेवाढ !!

रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ 1 ऑक्टोबर पासून लागू, रिक्षा दोन रुपये, टॅक्सी तीन रुपये व कुल कॅब सात रुपये भाडेवाढ !!

          मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी व कुल कॅब टॅक्सीची भाडेवाढ 1 ऑक्टोबर पासून लागू होईल. रिक्षा दोन रुपये, टॅक्सी तीन रुपये व कुल कॅबची सात रुपये भाडेवाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

     मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा व टॅक्सी यांचे दर हे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणामार्फत निश्चित केले जातात. प्राधिकरणामार्फत रिक्षा, टॅक्सी व कुल कॅबचे सध्याचे दर 01/03/2021 रोजी लागू करण्यात आले होते, परंतु गतवर्षाच्या तुलनेत चालू वर्षात सीएनजी इंधनाच्या दरात वाढ झालेली असून इंधनाचे दर प्रतिकिलो  49.40 रुपयांवरुन (01/03/2021) वरुन  80 रुपये झालेले आहे.

      खटुआ समितीच्या शिफारशींच्या आधारे, सध्याचा महागाई निर्देशांक व वाढलेले इंधनाचे दर इतर संबंधित बाबी विचारात घेऊन त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक/मालक व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हितास प्राधान्य देऊन प्राधिकरणाने 26/09/2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव क्रमांक 2/2022 पारीत केलेला आहे. या ठरावानूसार 01/10/2022 पासून ही भाडेवाढ लागू होईल, अशी माहिती मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

        भाडेवाढीस मान्यता देत असताना प्राधिकरणामार्फत खालील अटी अंतर्भूत केलेल्या आहेत. 1. उपरोक्त भाडेदर सुधारणा 01/10/2022 पासून लागू होईल. ऑटोरिक्षा टॅक्सी परवानाधारकांनी भाडेमीटरचे रिकंलीब्रेशन 01/10/2022 पासून  30/11/2022 पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारीत अधिकृत टॅरिफकार्ड  30/11/2022 पर्यंतच अनुज्ञेय राहील. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये पेट्रोल रिक्षांना सुध्दा सीेनजी इंधनावर चालणाऱ्या रिक्षांचेच दर लागू होतील.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर