सौदी अरेबियाचा राष्ट्रीय दिवस मुंबईत उत्साहात साजरा !!

सौदी अरेबियाचा राष्ट्रीय दिवस मुंबईत उत्साहात साजरा !!

           सौदी अरेबियाचा ९२ वा राष्ट्रीय दिवस मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सौदी अरेबियाचे मुंबईतील वाणिज्यदूत, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

    सौदी अरेबिया व भारताच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी बांग्लादेशचे उप उच्चायुक्त चिरंजीव सरकार, अफगाणिस्तानच्या वाणिज्यदूत जाकिया वर्दक, दक्षिण आफ्रिकेचे उप वाणिज्यदूत  (प्रशासन) इसाक नडाला, मलेशियाचे उप वाणिज्यदूत मोहम्मद स्यॅरकावी, गायक अदनान सामी, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, आमदार जीशान सिद्दीकी, आमदार अमीन पटेल, आमदार अबू आसिम आझमी, आमदार रईस शेख, अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी, कोकण बॅंकेचे संचालक बशीर मुर्तुझा, संचालिका तस्नीम काझी, डॉ समी बुबेरे, नबी अख्तर कुरैशी, यासहित मोठ्या संख्येने विविध देशांचे वाणिज्यदूत, उप वाणिज्यदूत, अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर