मराठी भाषा दिवसानिमित्त मराठी माणसाची भाषिक जबाबदारी खुली लेख स्पर्धा !!

मराठी भाषा दिवसानिमित्त मराठी माणसाची भाषिक जबाबदारी खुली लेख स्पर्धा !!

       मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दादर सार्वजनिक वाचनालय धुरु हॉल ट्रस्टच्या सहकार्याने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे शनिवार दि २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा काशिनाथ धुरु हॉल, दादर -पश्चिम येथे संध्याकाळी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

       या निमित्ताने दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुबंई, ठाणे शहर व ग्रामीण आणि नवी मुंबईतील वृत्तपत्र लेखक, निवृत्त व सध्या कार्यरत असलेले प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी मराठी माणसाची भाषिक जबाबदारी या विषयावर १००० शब्दमर्यादा असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची घोषणा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली आहे. पहिल्या ५ जणांना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र व इतरांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. युनिकोड फॉंट मध्ये टाईप करून दि २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत लेख chalval1949@gmail.com यावर पाठवावेत तसेच स्पर्धेची अधिक माहिती, नियमावली व आगावू नोंदणी करण्यासाठी अरुण खटावकर ९९६९०२७२७७ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी केले आहे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week