लोक गीताचा एक चांद मावळला!! कोळीगीताचे बादशहा, लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे निधन !

लोक गीताचा एक चांद मावळला!! कोळीगीताचे बादशहा, लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे निधन !

       दिनांक १३ जानेवारी २२ कोळीगीत सातासमुद्रापलीकडे पोहचवणारे, लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर श्री.काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर अंधेरी पश्चिम येथील ब्रम्हकुमारी आणि त्यानंतर के.ई. एम. रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

            पारंपरिक कोळीगीताचे बादशाह अशी त्यांची ओळख होती. कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करण्यामागे त्यांचा खूप मोठा वाटा होता. 'डोल डोलतय वाऱ्यावर, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू नेसली गो, पारू गो पारू, हीच काय गो गोरी गोरी पोरी, सन आयलाय गो नारळी पुनवेचा ही गाणी त्यांची अतिशय लोकप्रिय झाली. ह्या गाण्यांसारखी अनेक मधुर गीते त्यांनी लिहिली. त्यांनी निर्माण केलेल्या कोळी संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांनाच चांगले नाचायला लावले. त्यांनी लिहिलेली गाणी अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. एखाद्या समारंभात आणि लग्नात आवर्जून गायली जातात. बॅंड वर वाजवली जातात.

            अश्या ह्या लोकशाहीर काशीराम चिंचय यांना बातमीकार ऑनलाइन वृत्तपत्राचे संपादक श्री. अभिषेक शिंदे, वार्ताहर प्रीती तिवारी व बातमीकारच्या सर्व टीम तर्फे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन तसेच त्यांच्या कारकिर्दीस मानाचा मुजरा.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी