
मालमत्ता कर माफ, भूलभुलैया ??
मुंबईतील ५०० चौ फूट पर्यंतचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली असली तरी.. मुंबई महापालिकेतर्फे देखभाल खर्च (मेंटेनेन्स) म्हणून मलनिस्सारण कर, जल, पालिका शिक्षण, राज्य शिक्षण, रोजगार हमी, वृक्ष प्राधिकरण, पथ कर हे कर माफ करण्यात आले नाही आहेत. म्हणजेच देखभाल खर्च मधील, मालमत्ता कराची माफी मिळाली असून, तो वरील करांपेकी साधारणतः १० टक्के आहे. त्यामुळे या करामुळे मुंबईकरांना फक्त १०% माफी मिळणार आहे.
तत्पूर्वी ५०० चौ फूट घरांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ व्हावा आणि ५०१ ते ७०० चौ फूट पर्यंतच्या घरांना ६०% करात सवलत मिळावी, सदर मागणीचा ठराव मुंबई महापालिका सभागृहात ६ जुलै २०१७ च्या सभेत संमत केला आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारात अधिनियम १८८८ च्या कलम १४० व १४० अ मध्ये सुधारणा करणे अपेक्षित होते. परंतू राज्य सरकारने १० मार्च २०१९ रोजी राज्यपालांमार्फत अध्यादेश काढून मालमत्ता करात सर्व साधारण कर माफ करण्यात आला आहे. तरी इतर सर्व कर माफ केल्यास त्याचा मुंबईकरांचा फायदा होणार आहे ह्याची नोंद घ्यावी.