
रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत !
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, बी डी डी चाळ पुनर्विकास प्रकल्प, वरळी येथील पुनर्वसन इमारतीसाठीचा शुभारंभ हा आशिया खंडातील सर्वात मोठा नागरी महत्त्वाचा घटक. मुंबईतील गृह निर्मितीचे नवे पर्व, मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी आज या महत्वकांशी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री म्हणून माझ्या हस्ते होत आहे, उद्या चाळीतून तुम्ही टॉवर मध्ये गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका. अख्खे आयुष्य आपण ह्या ठिकाणी घालवले आहे, घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका, आणि मराठी पाळ मुळांना धक्का लावू नका असे उद्गार मुख्यमंत्री यांनी काढले असून यामध्ये पुनर्विकासात कोणीही बेघर होणार नाही, प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल असे म्हटले आहे.
तरी मोडकळीस आलेल्या झोपडपट्ट्या, जून्या मुंबई उपनगरातील इमारतींचे रखडलेले प्रकल्प, विकासकां विरुद्ध सन २०१७ पासून कारणे दाखवा नोटीस, काही विकासकांवर महारेराचा दणका, रखडलेले प्रकल्प सरकार ताब्यात घेणार! अशा बातम्या प्रसिद्ध होत असताना मुख्यमंत्री यांनी मुंबईतील गृह निर्मितीचे नवे पर्व म्हणून बी डी डी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ केला आहे. तरी करोना महामारीच्या काळात सरकारने विकासकांना कर्ज, व्याज, सवलत इ ची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यामुळे १०/१५ वर्ष भाडे बंद, रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊन लाखो मुंबईकर भूमिपुत्रांना स्वतःच्या हक्काचे घर मिळणार आहे.