सेलिब्रिटींनी मदत करावी !

सेलिब्रिटींनी मदत करावी !

        महाराष्ट्रात पावसाळी पुराने जन जिवन उध्वस्त केले आहे. घर, दुकाने, रस्ते सर्वच जमीनदोस्त झाले आहे. कित्येक जणांचे मृत्यू झाले आहेत. कित्येक नागरीक अजून बेपत्ता आहेत. अशा भयंकर, दुर्दैवी परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूरग्रस्तांना,"तुम्ही स्वतःला सावरा, बाकी सरकारवर सोपवा" असा दिलासा देत पाहणी करत आहेत. पक्ष संघटना, सामाजिक संस्था, आप आपल्या परीने वस्तू, भांडी, राशन, कपडे इ साह्य वाटप करीत आहेत. तरी अशा परिस्थीती मध्ये, मुंबई महाराष्ट्रातून लाखो, करोडो रुपये कमावणाऱ्या चित्रपट तारे तारका, खेळाडू, उद्योगपती यांनी आपणहून आर्थिक सहाय्य देऊन पूरग्रस्तांना दिलासा द्यावयास हवा. जेणेकरून सरकारवरचा आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम