
मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सुरु करा, भाजपा दक्षिण मध्य मुंबईचे स्वाक्षरी अभियान !!
मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सुरु करा, भाजपा दक्षिण मध्य मुंबईचे स्वाक्षरी अभियान !!
आज दोन वर्षे होत आली करोना महामारीमुळे संपूर्ण जगाचं जीवन विस्कळीत झालं. भारतात सुध्दा याचे परिणाम पहायला मिळाले. देशाची, महाराष्ट्रची आर्थिक राजधानी मुंबई जिथे लाखो कष्टकरी काम करून नोकऱ्या करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. करोनाच्या महामारीत लावलेल्या लॉकडाऊन मुळे कितीजण बेकार झाले नोकऱ्या गेल्या आर्थिक व्यवहार ठप्प झाले. अत्यंत दयनीय परिस्तिथी निर्माण झाली. मुंबई ची लाईफ लाईन असलेली लोकल ही बंद करण्यात आली होती. परंतु आता करोनाच्या दुसऱ्या लाटेच प्रमाण कमी होताना दिसत आहे. त्यातच करोनाच्या वॅक्सिन चा ही वेग वाढला आहे.
परंतु मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सेवा अजूनही अत्यावश्यक सेवेत असलेल्या, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त खुली करण्यात आली आहे. आज लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत काम करण्यासाठी येतात. परंतू लोकल प्रवास सामान्य नागरिकांसाठी बंद असल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा दयावी ह्यासाठी सुविधा स्टोर दादर रेल्वे स्थानक पश्चिम येथे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. ह्या प्रसंगी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार श्री मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व स्वाक्षरी अभियानात जमलेल्या लोकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमा अंतर्गत भाजपाचे बोरिवली विधान सभेचे आमदार श्री सुनील राणे अतिथी म्हणून उपस्थित होते.