
हम पर प्रांतीय नही, घर प्रांतीय है !
भाजपा उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संजय पांडेय यांची घोषणा !
बीजेपी उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेश तर्फे भाजपा प्रदेश कार्यालय येथे कोकण प्रांताची बैठक बोलविण्यात आली, कोकण प्रांताच्या बैठकीत उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ.संजय पांडेय यांनी' हालचाल' यात्रेची घोषणा केली, ते म्हणाले की ही यात्रा महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीय समाजाला उत्तर भारतीय मोर्चा च्या कार्यकर्त्यांशी आणि महाराष्ट्र भाजपाला जोडण्याचा प्रयास आहे. आणी त्यांना एका मंचावर आणण्याचा प्रयास आहे ते स्वतः आणि त्यांची टिम हर उत्तर भारतीयां पर्यंत पोहचतील आणि सर्वाना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील.
त्या जोगे उत्तर भारतीयांचे नेतृत्व करून त्यांचे मुद्धे उचलून धरण्यास सुविधजनक होईल. ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील उत्तर भारतीय समाजाचे प्रश्नांना जोडणे आणि त्याचं निवारण करण्यासाठी डॉ.पांडेय यांनी उत्तर भारतीय यांच्या डेटा संग्रहासाठी एक गुगल फॉर्म लॉन्च केला आणि कार्यकर्त्यांना त्यावर काम करण्यास सांगितले. ते आपल्या भाषणात म्हणाले की उत्तर भारतीय पर प्रांतीय नही है ! घर प्रांतीय है ! उत्तर भारतीय प्रगत आणि सुशिक्षित महिलांनी पार्टीचे काम करण्यासाठी पुढे यायला हवं ह्यासाठी डॉ. संजय पांडेय यांनी उत्तर भारतीय महिला मोर्चा सेल ची घोषणा व शिक्षक सेलची घोषणा केली. सविता सिह यांना उत्तर भारतीय म.मोर्चा संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आलं. उत्तर भारतीय बिहार सेल चे संयोजक म्हणून फुल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.
भाजपा मध्ये सामील झालेले महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते श्री कृपा शंकर यांचा उत्तर भारतीय मोर्चा तर्फे सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित उत्तर भारतीय म.मोर्चा महाराष्ट्र अध्यक्षा श्वेता शालिनी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. बैठकीत ब्रिजेश सिंह, प्रदूमन शुक्ला, मनोज राय, मनोज कडाई, संतोष उपस्थित होते.