भारतीय जनता पार्टी वरळी विधान सभेतर्फे कोविड सहायता केंद्राचे उदघाटन !!

भारतीय जनता पार्टी वरळी विधान सभेतर्फे कोविड सहायता केंद्राचे उदघाटन !!

       मुंबईत सध्या करोनाची बिकट परिस्थिती सुरू आहे. करोनाची लागण झपाटयाने होऊन करोनाच्या रुग्णांत भलतीच वाढ होत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये ही करोना रुग्णांना सोयी अभावी उपचार मिळणं कठीण होऊन बसले आहे. किती जणांना उपचार न मिळाल्यामुळे, ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

      ह्या सर्व बाबी लक्षात घेता वरळी विधान सभेतील वॉर्ड क्र. १९३ यांनी कोविड सहायता केंद्राचे उदघाटन केले आहे. ह्यात कोविड पोझिटिव्ह रुग्णांना मोफत स्टीफिन व्यवस्था, बेड व्यवस्था, ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्था, तसेच सेनेटाईझर फवारणी इ.व्यवस्था विनामूल्य करण्यात येणार आहे. ह्यात कुठलीही प्रकारची किंमत श्रेणी लागू केली जाणार नाही. तसेच इनडोर डायनींग, बाहेरची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. असे वरळी विधान सभेचे अध्यक्ष श्री दिपक पाटील यांनी माहिती देताना सांगितले.

मदतीसाठी संपर्क

पद्माकर चव्हाण /दिपक पाटील

फोन मोबा.9324860617/9819454625


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week