
सामान्यांनी जगायचे कसे !
उज्वला योजने तर्फे गॅस सिलेंडर मोफत देण्यात आले. केंद्र सरकारने ऐपत नाही त्यांना गॅस सबसिडी देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ग्राहकाचे सबसिडीचे पैसे सरळ बँकेत जमा होत होते. परंतु मागील वर्षापासून सबसिडी बँकेत जमा होत नाही आहे. ह्या करोना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई मध्ये १ सप्टेंबर २०२० ला ५९४ मिळणारा सिलेंडर आता जुलै २०२१ ला ८३४ रु ला मिळत आहे. वर्षभरात २४० रु ची वाढ झाली आहे. तरी करोना काळात लाखोंच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आणि आता सबसिडी शिवाय गॅस घ्यावयास लागत आहे. अश्या महागाईत सर्व सामान्यांनी जगायचे कसे ?