
वरळीत महिलांसाठी भाजपाचे प्रशिक्षण !
मुंबई वरळी: करोना महामारीच्या काळात रोजगार बंद झाले आहेत. सामान्य माणसाला कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण होऊन बसले आहे. ह्या कठीण परीस्थितीत महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी सणासुदीच्या काळात आर्थिक सहाय्य साध्य व्हावं ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता भाजपाचे नेते व बोरीवली मतदार संघाचे आमदार सन्मानीय सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरळी विधानसभा अध्यक्ष श्री. दीपक पाटील यांच्या नेतृत्वात भाजप वार्ड क्रमांक १९३ चे वार्ड अध्यक्ष श्री. पद्धमाकर चव्हाण ह्यांच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गत रक्षा बंधन निमित्त राखी बनवण्याचे प्रशिक्षण विभागातील महिलांना देण्यात आले.
साक्षी सावंत महिला मोर्चा अध्यक्ष वरळी विधान सभा यांनी राखी बनविण्यांच प्रशिक्षण महिलांना दिलं. ह्या कार्यक्रमा अंतर्गत श्रीमती उज्वला मिरके म. मोर्चा अध्यक्ष, प्रमोदींनी शिरोडकर म.मोर्चा उपाध्यक्ष, श्री. मनोहर काळे महामंत्री, ऋषभ पवार यु.मो.अध्यक्ष इ. शिबिरात सहभाग घेतला.