बेघरांचे प्रथम पुनर्वसन व्हावे !

बेघरांचे प्रथम पुनर्वसन व्हावे !

       "मुंबईतील बी डी डी चाळ पुनर्विकासात कोणीही बेघर होणार नाही. चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल. त्याकरीता मंत्रीस्तरीय समिती स्थापन करून तातडीने कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत." असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. झोपडपट्टी, मोडकळीस आलेल्या जून्या इमारती, इमारतींचे रखडलेले प्रकल्प, विकासांविरुद्ध सन २०१७ पासून करणे दाखवा नोटीस, काही विकासांवर महामारीचा दणका, रखडलेले प्रकल्प सरकार ताब्यात घेणार, अशा बातम्या प्रसिद्ध होत असताना, मुंबईतील बी डी डी चाळींचा पुनर्विकास सरकार तर्फे करण्यात येणार आहे, असे जाहीर झाले आहे. आणि त्यावेळी तत्कालीन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी बी डी डी चाळीच्या पुनर्विकासासाठी २२ एप्रिल २०१७ रोजी भूमिपूजन केले आहे. तरी आता करोना महामारीच्या काळात सरकारने विकासकांना कर्ज, व्याज, सवलत इत्यादीची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तरी १०,१५ वर्ष पुनर्वसनाची वाट पाहूत मृत्यू पावलेले, भाडे बंद बेघर झालेल्या लाखो मुंबईकर भूमीपुत्रांचे प्रथम त्यांचे स्वतःच्या घरामध्ये पुनर्वसन होणे आवश्यक आहे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week