
निवडणुका पुढे ढकल्याव्यात !!
करोना महामारीच्या किती लाटा येतील याचे कोणीही तज्ञ सांगू शकत नाही. तरी पाच राज्यातील निवडणुकांमधील लाखो लाखोच्या प्रचारसभा त्यानंतर झालेल्या निवडणुका, त्यातही कुंभमेळाला दिलेली परवानगीमुळे करोनाचा प्रसार वाढला. आणि स्मशानात प्रेताच्या रांगा लागल्या. गंगा नदी पर्यंत प्रेते वाहत आली. लस ऑक्सीजन सिलेंडर इ मिळत नाही आहेत. असे भयंकर अनुभव असल्यामुळे महाराष्ट्र, मुंबई महानगर पालिका आणि इतरत्र निवडणुका फेब्रु, मार्च २०२२ दरम्यान घेणे क्रमप्राप्त आहे. तरी करोना महामारीचा दुर्दैवी अनुभव लक्षात घेता निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलाव्यात.