
फक्त लोकप्रिय घोषणा नको !
मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना.. केंद्र सरकारने लस पुरविल्यास विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे. लसीसाठी राज्य सरकारकडे पैसा असला तरी राम्डेसिवीर, ऑक्सिजन सिलेंडर इ साधनांचा अपुरा पुरवठा नवीन कॉवीड सेंटर उभारण्यासाठी येत आहे.
यासाठी पैसे लागणार. तरी आता १८ ते ४४ वर्षाच्या नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. परंतु दुर्दैवाने तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आणि संपूर्ण देशभरात लसीकरण करण्यास तीन वर्ष लागणार असे प्रसिद्ध होत आहे. तीन वर्षात कोणत्या घडामोडी होतील ते सांगता येत नाही. तरी १८ ते ४४ वर्ष नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येत असले तरी (५ कोटी ७१ लाख हे १८ ते ४४ वयोगटातील महाराष्ट्रात नागरीक आहेत, त्यासाठी साडे सहा हजार कोटी रु ची तरतूद करावी लागणार आहे).
आजकाल राहणीमान सुधारणाऱ्या १८ ते ४४ वर्षाचे नागरिक कामकाज, नोकरी धंदा करीता, २ चाकी ४ चाकी वाहनांचा सरार्स वापर करीत आहेत. ज्यांना परवडत असेल अशांनी मोफत लस घेण्यापेक्षा एक सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून खासगी रुग्णालयातून रु २५० ते ४०० रु देऊन लसीकरण करून घ्यावे. त्यामुळे मुख्यमंत्री केअर फंडात देणगी जमा होऊन सरकारचा आर्थिक भार कमी होऊ शकेल. त्याकरीता सरकारने लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा तरुणांना देणगी मूल्य देऊन लसीकरण करण्यास प्रवूत्त करावे.