
तर बँकेत मराठी गायब होणार ?
वि. वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनी २७ फेब्रूवारी रोजी मराठी भाषादिन साजरा करण्यात येतो. त्यादिवशी माझ्या मराठीचे बोलू कौतुके असे म्हणत शासन, सामाजिक, शैक्षणिक संस्थातर्फे सर्वत्र मराठी भाषादिन साजरा करण्यात येतो. सर्वच बँकांतर्फे A T M आणि बँक पासबुक भरण्याकरिता इले्ट्रोमॅग्नेटिक मशीनचा वापर करण्यात येतो. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश अशा तीन भाषांच्या वापर करण्यात येतो.
परंतु मराठी म्हणवणारे ही इंग्लिश पर्यायाचा वापर करीत असतात. काही विशिष्ट संख्येएवढा मराठी मध्ये वापर झाला नाही तर इलेकट्रोनिक मशीन मधून मराठी गायब होण्याची शक्यता आहे. तरी मराठी साठी शासकिय परिपत्रक काढून न्यायालयाने निर्णय देऊन ही चालणार नसून मराठी टिकवण्यासाठी ज्ञानभाषा, लोकभाषा होणे गरजेचे आहे. निदान स्वतःपासून बँकेचे इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये मराठीचा जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे.