
धोक्याचा इशारा खबरदारी घ्यावी !!
करोना लॉकडाऊन चे नियम पाळले नाही तर राज्यात पुन्हा ताळेबंदी लावण्यात येईल, असा मुख्यमंत्री इशारा देत आहेत. मुंबईच्या महापौर स्वतः नियम पाळले जात आहेत का याची पाहणी करीत आहेत. अशी परिस्थिती असून ही सर्व सामान्य नागरिक बसेस, रेल्वे मधून गर्दी करून प्रवास करीत आहेत. इतरत्र मुंबईत नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. हे सर्व कारोना वाढीस कारणीभूत असले तरी, करोना चा संशय आल्यास, सामान्य नागरिक खासगी रुग्णालयात तपासणी साठी गेल्यास, हमखास करोना पॉझीटीव म्हणून रिपोर्ट देण्यात येतो. त्याकरीता तपासणी म्हणून हजारो रूपये घेत आहेत. करोनावाढ कमी झाली अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मास्क लावणे, हाथ धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या नियमांचे दुर्लक्ष होत आहे.
आता करोना वाढीचा इशारा वृत पत्रातून, चॅनल वरून, समाज माध्यमांतून प्रसारीत होत आहे. तरी माझे कुटुंब, माझी जबाबदारी असे आता प्रत्येकाने स्वतः पासून सूरवात कराव्यास हवी. अशी खबरदारी घेतल्यास करोना पासून वाचता येईल.