
निराधारांना उत्पन्नाचा दाखला नको !
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना इ योजनेमध्ये मासिक पेंशन मिळते. त्याकरीता त्यांना एप्रिल महिन्यात उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. तरी आता तहसीलदार कचेरीतुन मागण्यात येत आहे.
परंतु करोना लॉकडाऊन मुळे सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे अशांना उत्पन्नाचा दाखला कसा मिळणार ? पुन्हा एप्रिल २०२१ ला उत्पन्नाचा दाखला मागिवण्यात येणार. त्यात लाखोंच्या नोकऱ्या गेल्या असतांना, या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आहेत. अशांना आता नोकऱ्या मिळणार आहेत का ? तरी समाज कल्याण मंत्रालयाने निराधारांकडून कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचा दाखला न मागता त्यांची पेंशन चालूच ठेवावी.