
अर्थ संकल्पात पेन्शनरांचे पैसे मिळावेत !
अर्थमंत्री १ फेब्रु रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लॉकडाऊन काळात सर्व सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहेच, तरी भविष्य निर्वाह निधी योजना १९९५ चे ६७ लाख पेंशनरांचे केंद्र सरकार कडे २० लाख ८०हजार कोटी रु, या मध्ये ४० हजार कोटी रु अनक्लेम रक्कम जमा आहे. केंद्र सरकारला भगत सिंग कोशीयारी समितीने दिलेला अव्हाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, त्याचप्रमाणे या करीता पेंशनर संघटनांनी देशभर आणि दिल्ली पर्यंत मोर्चे आंदोलने केली आहेत. संसदे मध्ये कित्येक खासदार या पेंशन वाढीची मागणी करत आहेत.
प्रत्यक्ष मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार श्रीमती हेमामालिनी यांनी पेंशनर पदाधिकार्यांशी भेट घेतली आहे. पंतप्रधानांनी सकारात्मकता दाखवली आहे. करोना काळातील व सध्याच्या महागई काळात अत्यंत केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी अर्थ मंत्र्यांनी करोनाचे कारण न देता पेन्शनरांची स्वतःची रक्कम सरकारकडे जमा आहे ती, अर्थ संकल्पात जाहीर केल्यास ज्येष्ठ नागरिक पेन्शनरांना पुढील काही वर्ष सन्मानाने जगता येईल.