
मयताचा चेहरा नसताना केलेला तपास.......
(ज्येष्ठ पत्रकार - रमेश औताडे) पोलिसातील माणुस तुम्ही जाणुन घ्या रे जरा, हे एका मालिकेतील गाणे खुप गाजले होते.पोलिसांकडे बघण्याचे दृष्टीकोन प्रत्येक नागरिकांचे वेगवेगळे असतात. मात्र पोलीस हे काय करू शकतात याचे एक उदाहरण एका चेहरा नसलेल्या मयताच्या खुनाच्या घटनेतुन समोर आले आहे. चेहरा दगडाने चेंदामेंदा झालेल्या मयताच्या तपासात पोलिसांना कसे यश येते व गुन्हेगार कसे गजाआड जातात यासाठी पोलिसांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
एका ३० वर्षीय तरुणाचा चेहरा चेंदामेदा केलेला आहे. मयताच्या जवळ काहीच ओळखीचे पुरावे नाहीत. हा मृतदेह कोणाचा हा प्रश्न पोलीसांपुढे पडला आहे. हा तरुण बेपत्ता असलल्याची तक्रारही कोठे नाही. या स्थितीत पोलीस गोंधळात पडलेले असतात.
मात्र मुंबई पोलिसांचे नाव जागतिक पातळीवर घेतले जाते. अशा नावाजलेल्या पोलीसांनी गोंधळुन न जाता या मयताच्या ओळखीचा छडा लावण्यासाठी रात्रीचा दिवस केला. वेगवेगळी पथके तयार करत सर्व विभाग पिंजुन काढला, तरीही मृताची ओळख पटत नव्हती.
दरम्यान घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर पे ॲन्ड पाक जवळ ज्या ठिकाणी दगडाने ठेचुन या तरुणाचा खुन झाला होता त्या ठिकाणी कोणी साक्षीदार आहे का हे पाहण्यासाठी त्या भागातले सर्व सिसिटीव्ही कॅमेरे तपासले. अंधार असल्याने काहीच दिसत नव्हते. मात्र एक धागा सापडला . एका वॉचमाने हा प्रकार पाहिला होता. मात्र खुन करणारयांच्या भितीने तो वॉचमन सविस्तर सांगत नव्हता. पोलीसांनी त्याला विश्वासात घेत माहिती घेण्यास सुरुवात केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला. दोन तरुण या मयत तरुणाला लुटत असताना हा खुन झाला आहे. दोन तरुण हे याच परिसरात राहणारे आहेत. त्यांची नावेही पोलीसांना त्या वॉचमनने सांगितली.सर्व चक्रे फिरवत पोलीसांनी कुरेशी (२०) व चौधरी (२२) या दोन तरुणांना गजाआड केले. मात्र हे दोन तरुण नशेमध्ये हे कृत्य करुन गेले होते. त्यांची नशा खुन झाल्यानंतर दोन दिवस उतरली नव्हती.या दोघांनी या मयत तरुणाला लुटले.त्याच्या खिशातील सहाशे रुपये व मोबाइल चोरला. त्याला मारहाण केली.त्याच्या चेहरयावर दगडाने इतका प्रहार केला की तो ओळखता येवु नये.
पोलसांनी आरोपींना गजाआड केले मात्र मयताची ओळख पटत नव्हती.अशा स्थितित पोलिसांचे मयताच्या हाताकडे लक्ष गेले. एका बोटावर मतदानाची शाई लागली होती. तसेच बी व के हि अक्षरे गोंदली होती.
आता पोलीसांचे काम अर्धे झाल्याने पोलीस अजुन जोमाने तपासाला लागले. त्या विभागातील साडे तीनलाख मतदार शोधण्याचे त्यांनी ठरवले. मतदार याद्या आणल्या गेल्या. बारा पोलीसांचे पथक रात्रंदिवस नावे शोधु लागले. बी व के ही नावे पाहत असताना मुलांची, महिलांची, वृध्दांची नावे एका बाजुला केली गेली. शवविच्छेदन करताना तो मुस्लीम नाही हे स्पष्ट झाल्यामुळे मुस्लीम नावे घेतली नाहीत. साडेतीन लाखातुन अशी वर्गवारी केली गेली. फक्त तरुण वयाची नावे व बी व के ही नावे शोधली त्यांच्या पत्याप्रमाणे त्यांच्या घरी तपास सुरु केला. मयताची ओळख पटण्याआधी आरोपी गजाआड करण्यात पोलीसांना यश आले होते. आता मयताची ओळख पटवायचीच असा निर्धार करत आता मतदारांच्या घरच्या पत्यांच्या तपासाचा अंतीम कार्यक्रम सुरु असताना पोलीसांना मयताच्या आइची भेट एका घरी झाली. त्या मातेने सांगितले माझा मुलगा बेपत्ता आहे. त्या मातेला पोलीसांनी विचारले की तुम्ही तक्रार का केली नाही तर ती म्हणाली तो दारुडा आहे. त्याच्या या व्यसनामुळे त्याची पत्नी मुलांना घेवुन त्याला सोडुन गेली आहे. मी व तो दोघेच असतो. दारु पिवुन कुठेतरी मित्राबरोबर असेल म्हणुन मी तक्रार केली नाही. आता ही ओळख अजुन पककी होण्यासाठी मुलाचा मृतदेह तिला दाखवला असता तिने ओळखले. त्याच्या हातावर बी व के हि अक्षरे त्या मातेने पाहिली व ओळख पटली. के म्हणजे मयत तरुण किरण व बी म्हणजे त्याच्या प्रियसीचे नाव असे त्याच्या आइने सांगीतले. अशा प्रकारे देवनार पोलिसांनी या कामी मोहीम फत्ते केली.
तपासीय अधिकारी पोलिस निरिक्षक एम एफ सरोदे यांनी या गुन्हयात महत्वाची भुमीका पार पाडली. तसेच पोलिस अधिकारी सुर्यवंशी, बाबर, चंदन व पथकाने तपास पुर्ण केला. पोलिस उपायुक्त शशिकुमार मिना व वरिष्ठ पोलिस निरीक्षक दराडे यांचे मार्गदशन तपासा दरम्यान झाले.