पवारांकडून पेंशनरांची अपेक्षा !

पवारांकडून पेंशनरांची अपेक्षा !

         शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा वृतांत वाचण्यात आला असता. क्रीडा क्षेत्रातील प्रशासना मधील त्यांच्या कार्यामुळे क्रिकेट मधील, वयोवृद्ध खेळाडूंना पेन्शनवाढ मिळाली आहे. तरी पवार साहेबांचा १२ नोव्हेंबर रोजी ८० वा वाढदिवस साजरा होणार आहे. त्यांना शुभेच्या देताना खासगी क्षेत्रातील इ पी एस १९९५ मधील ६६ लाख ज्येष्ठ नागरिक समाविष्ट असून या पेंशनरांचे भविष्य निर्वाह निधी मध्ये ११ लाख करोड रु जमा असून, मागील २५ वर्षात त्यांच्यावर अन्याय होत आहे. तत्पूर्वी मा. मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोशियारी समितीची पेंशनवाढ मिळवून देतो असे आश्वासन मिळवून देतो असे आश्वासन दिले होते. पण आता त्यांचे आश्वासन विस्मृतीत गेले आहे. तरी सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे पेन्शनवाढ मिळावी, या संबंधी समन्वय समिती मागील १० वर्षा पासून पेन्शनवाढ मिळावी म्हणून मागणी करत आहेत. त्याकरीता दिल्ली पर्यंत मोर्चे, धरणे आंदोलन करीत आहेत. त्याचप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृह मध्ये कित्येक खासदार पेन्शनवाढी संबंधी सातत्याने मागणी करीत आहेत. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी ही मागणी केली आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी क्रिकेट खेळाडूंना आणि कुटुंबियांना पेंशन मिळवून दिली. आणि बहुमताच्या जोरावर कामगार कायदा पास करून घेतला,

       परंतु कृषी विषयक कायद्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे नमते घ्यावे लागत आहे. तत्पूर्वी करोना महामारीच्या काळात कित्येक ज्येष्ठ नागरिक मरण पावले आहेत. अशा देशभरातील भयानक परिस्थितीत इ पी एस ९५च्या पेंशनरांची पेन्शनवाढ महागाई भत्ता सह, विधवांना १००% पेंशन, वैद्यकीय मदत या संबंधीच्या मागण्या पवार साहेबांनी लक्ष घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर्फे मिळवून दिल्यास पवार साहेबांचे करोडो पेन्शनर ऋणी राहतील.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week