स्वयंपाक गॅस महागला !
केंद्र सरकारने ऐपत नाही त्यांना गॅस सबसिडी देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ग्राहकाचे सबसिडी चे पैसे सरळ बँकेत जमा होत होते. परंतु मागील ३ महिन्यांपासून सबसिडी बँकेत जमा होत नाही आहेत.
ह्या करोना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. एल पी जी सिलेंडर ची किंमत ५०₹ ने वाढवली आहे. त्यामुळे मुंबई मध्ये १ सप्टेंबर पासून ५९४ मिळणारा सिलेंडर ६४४₹ ला मिळत आहे. त्यामुळे दर सिलेंडर मागे मिळणारी सबसिडी मागील ३ महिने मिळू शकली नाही. आणि ह्या पुढे कधी मिळणार हे जाहिर झालेले नाही.