
लस टोचणी, स्वयंसेवकांचा विमा हवा !
करोना वॅक्सिंगची टेस्ट करण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ रिसर्चने पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वॅक्सिंग ची निर्मिती केली असून देश भरातील १० केंद्रात मानवी चाचणीसाठी पुढे येणाऱ्या १६०० निरोगी व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीत मानवी शरीर रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काय करते आणि लस कितपत सुरक्षित आहे, याची खात्री केली जाणार असली तरी, या संबंधी १६०० स्वयंसेवक मुळे कोट्यवधी जनतेचे प्राण वाचणार आहेत.
अशा आत्मसपर्पण करण्याऱ्या करोना योध्याना प्रणाम करतांना, सन्मान करतांना त्यांना जीवन विम्याचे संरक्षण मिळावयास हवे.