
न्यायालयीन सुट्या कमी व्हाव्यात !!
न्यायालयीन खटले प्रलंबित राहू नयेत, या करीता स्थगिती आदेशाला कालमर्यादा घालणारा आदेश, सर्वोच न्यायालयाने दिला आहे. यावर उपाय म्हणजे न्यायालयीन कामकाजाच्या सुट्यां मध्ये कपात करावी. (हिवाळी, दिवाळी) त्याचप्रमाणे देशभरातील न्यायधीशांच्या हजारो जागा रिक्त आहेत. न्यायालये वाढवावीत. ज्येष्ठ वकील न्यायाधीश होऊ शकतात. त्याचप्रमाणे काही विशिष्ठ केस मध्ये सेलिब्रिटी ना रात्री न्यायालये सुरू ठेऊन सुनावणी देण्यात येते. तरी अशा न्यायालयीन प्रकारणाबद्दल आणि सुट्या कमी होण्याबाबत सर्वोच न्यायालयाने निर्णय देणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णय लवकर लागतील.