
वीज भरणा केंद्र सुरू करा !
लॉकडाऊन हळू हळू खुले होत असून, खासगी क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेतील हजेरी वाढत आहे. बस सेवा सुरू होत आहेत. दुकाने, मॉल, बार इत्यादी सुरू झाले आहेत. वृत्तपत्र, वीजबिल घरपोच दिले जात आहेत.
कित्येकांना विजबिले ऑनलाइन भरता येत नाहीत. लोअर परळ परिसरातील शिवालय, वरळी नाका, दादर गोखले रोड, प्रभादेवी मंदिर इत्यादी परिसरातील व त्यासोबत मुंबईतील सर्वच वीजदेय भरणा केंद्र बेस्ट प्रशासनाने सुरू करावित अशी चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे
त्याची दखल सरकारने घावी अशी जाहीर मागणी जेष्ठ पत्रकार विजय कदम यांनी केली आहे.