
मराठीचा अपमान करण्याची हिंमत कशी होते !
मुंबईतील कुलाबा परिसरातील "महावीर" ज्वेलर्स या दुकानामध्ये मराठी भाषेसाठी लढा देणाऱ्या लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानामध्ये मराठीतून बोलण्याचा आग्रह केल्यामुळे त्या दुकान मालकाने पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर काढून ८० वर्षाच्या महिलेचा अपमान आणि मराठी भाषेचा ही अपमान केला आहे. त्याविरुद्ध देशपांडे यांनी दुकानाबाहेर २० तास ठिय्या आंदोलनामुळे एका वृत्त वहिनीने वृत्त प्रसारीत केल्यामुळे मराठी अस्मितेचे नेते मंडळी देशपांडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि दुकानदाराला विरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी दूरदर्शन चॅनेल वर दिसू लागले. (दुकानदारानी देशपांडे बाईंची माफी मागितली)
परंतु यात देशपांडे या सुमारे २० तास दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करताना दृष्टीत पडल्या नाही हे दुर्दैव. तरी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई मध्ये मराठीचा आग्रह करण्यासाठी भांडावं लागत आहे. हे फार दुर्दैवी आणि दुःखदायक असून, यासाठी मराठी माणसाने आत्मचिंतन करणे गरचेचे आहे. तरच यांची मराठी भाषेचा अपमान करण्याची हिंमत होणार नाही.