
राहुल गांधी यांची विधायक भूमिका !!
राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतेच संकटकाळी विरोधी पक्षांनी काय करावे या संबंधी सविस्तर पणे जनतेशी संवाद साधत करोनाचा प्रसार वाढत असताना घेतलेली संयमी, सकारात्मक आणि जागरूक विरोधी पक्षाच्या भूमिकेचे कौतुक करावयास हवे.
देशाने एकत्र येऊन लढावयास हवे. त्यात आपला सरकारला पूर्ण पाठींबा असण्याचे सांगताना सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. असे राहुल गांधी यांचे विचार सर्वोत्तपरी संयमी, देश हिताचे व राजकीय शहाणपणाचे आहे. लॉकडाऊन म्हणजे राष्ट्रसेवा म्हणुन लोकांनी घरी बसावे. इथपर्यंत ठीक असले तरी लॉकडाऊन हा करोना वर उपाय न्हावे तर पोझ बटन आहे. त्याचप्रमाणे गांधी यांनी आर्थिक संबंधीचे विचार मांडले आहेत. तरी अशा प्रकारे विधायक, सकारात्मक आणि संयमी विचार सर्वत्र समाज माध्यमांनी, प्रसार माध्यमांनी प्रामाणिक, तटस्थपणे देश जनतेपर्यंत पोहोचावयास हवे.