
ABP माझा वृत्त वाहिनीचे चुकलेच !!
वांद्रे स्थानक बाहेरील झालेल्या गर्दीचे ABP माझा चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या सकाळी 9 च्या वार्तांकनाच्या आरोपामुळे जामीन मंजूर होऊन सुटका करण्यात आली आहे. याच दरम्यान बुधवार १५ रोजी रात्रौ ८ वाजता ABP माझा चे संपादक राजीव खांडेकर यांनी चॅनेल ची भूमिका त्यांच्या पद्धतीने मांडली आहे. त्यानंतर राहुल कुलकर्णी यांच्या अटके संबंधी आघाडीचे वृत्तपत्र, ज्येष्ठ पत्रकार, सोशल मीडिया वर अटक चुकीची असल्याचे समर्थन करीत आहेत.
या प्रकरणा नंतर सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. तत्पूर्वी मंगळवार दि १४ सकाळी ९ च्या बातम्यांमधे, बातमी देतांना रेल्वेच्या पत्रकाचा दाखला देत केले होते. त्यानंतर पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सकाळी १० वाजता ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ABP माझाच्या सकाळी ९ ची बातमी म्हणजे रेल्वे गाड्या संबंधीचे पत्रक रद्द झाले. म्हणजे अशावेळी ११ आणि दिवसभरातील कोणत्याही बातमी मध्ये या संबंधी खुलासा जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे जर तो खुलासा बातमी मध्ये जाहीर झाला असता तर, जनतेमध्ये रेल्वे गाड्या संबंधीचा संभ्रम निर्माण झाला नसता. आणि वांद्रे स्थानकाजवळ जमलेल्या गर्दीचा आरोप ABP माझा वर येऊ शकला नसता. त्यामुळे ABP चे वार्तांकन चुकलेच आहे. शेवटी न्यायालय न्याय देणार आहे.