
निवृत्त कामगारांना किमान नऊ हजार पेन्शन द्या....
ठाणे : सन २०२०-२०२१ च्या अर्थ संकल्पात EPS (1995) सभासदांचा समावेश न केल्यामुळे, केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी, निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने, ठाणे येथील नाईक सभागृहात भव्य सभा घेण्यात आली. अध्यक्ष स्थानी विनायक गोडसे व पाहुणे म्हणून ताहाराबादकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अर्थसंकल्पात ईपीएस चा समावेश न केल्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. अर्थसंकल्पात CBT मध्ये EPS पेन्शनराचा समावेश करावा, त्यांना रु नऊ हजार किमान पेन्शन द्यावी व सर्व पेन्शनराना एकत्रित करून सर्व प्रलंबित समस्या व प्रश्न केंद्र सरकार कडे मांडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. अध्यक्ष- विनायक गोडसे, विजय कदम, रमाकांत कदम, विकास कुलकर्णी, प्रिया परब, रमाकांत भगत, उपाध्यक्ष- विष्णू चव्हाण, कोषाध्यक्ष- सदानंद ढगे, ठाणे वैभव चे पत्रकार- सुभाष जैन आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सभेस मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील पेन्शनर मोठया संख्येने सहभागी झाले होते. चिटणीस रमाकांत कदम यांनी
उपस्तिताचे आभार मानले.
(बाळ पंडित - मुंबई)