
मूर्तींची उंचीची मर्यादा आणि महापौरांचे भाष्य !
सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांच्या विचाराने अभिप्रेत होऊन स्वतंत्र लढ्याला प्रेरणा मिळाली होती. परंतु आताचा सार्वजनिक गणेशोत्सव हा नवसाला पावणारा, राजा महाराज्यांचा नावाने प्रसिद्ध होत असून हा उत्सव आता भव्यदिव्य अशा सजावट रोषणाईने साजरा होत आहे. सेलिब्रिटीज ना आमंत्रित करून भाविकांना आकर्षित करणारा इव्हेन्ट झाला असला तरी, काही उत्सव मंडळ सामाजिक कार्य, रक्तदान, आर्थिक मदत करत आहेत. अशा गणेशोत्सव मंडळाचा स्पर्धेचा गणेशगौरव पुरस्कार नुकताच महापालिका सभागृहात महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सभारंभात करण्यात आले असता,
महापौर म्हणाल्या, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे समाजातील विविध समस्यांवर जागृती करत आहेत. प्लास्टिक बंदी, पर्यावरण, वृक्षरोपण, संवर्धन, व्यसनमुक्ती हे विषय आता सर्वत्र पोहोचवत आहेत. ह्याचे श्रेय मंडळांना जाते. पण गेल्या काही वर्षात गणेशमूर्तींची उंची वाढत आहे. अशा गणेश मूर्तींची उंची वाढवण्याची गरज नाही. तर सामाजिक भान जपणाऱ्या आणि वाढवणाऱ्या उपक्रमाची उंची वाढवण्याची गरज आहे. तरी आता पुढील वर्षात गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादाचे आव्हान अमलात यावे.