इ पी एस ९५ चे पेन्शनर उपाशी !

इ पी एस ९५ चे पेन्शनर उपाशी !

 अर्थसंकल्पात पेन्शनर उपेक्षित, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरीक, विकलांग करीता ९,५०० कोटी रु निधी जाहीर केला आहे. तत्पूर्वी E P S १९९५ (employee pension scheme) नुसार पेन्शनर, ज्येष्ठ नागरीक यांना फक्त ७५० ते १५०० रु पर्यंत पेन्शन मिळत आहे. परंतु याच कामगारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी १९९५ योजने मध्ये ६७ लाख पेंशनर कामगारांचे अब्जावधी रु सरकार कडे जमा आहेत. पेन्शनरांवर  २४ वर्ष अन्याय होत असून पेन्शनवाढी संबंधी भगतसिंग कोशियारी समितीने केलेली शिफारस, ३ हजार रु मासिक आणि महागाई भत्ता. त्याचप्रमाणे सर्वोचं न्यायालयाने दिलेला निर्णय ७ हजार रु महागाई भत्ता, वारसदारांना १००% पेंशन, वैद्यकीय भत्ता याची अंमलबजावणीची मागणी कित्येक खासदारांनी केली आहे. संबंधित मंत्रांनी आश्वासनं दिलेली आहेत.

 तरी या अर्थसंकल्पात सब का साथ, सब का विकास  घोषणा असताना E P S १९९५ पेन्शनरांना, कोणत्याही प्रकारची वाढ न झाल्यामुळे ते उपेक्षित राहिले आहेत.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week