पिस्तूल मॅक्झिन व जिवंत काडतुसे मुंबई पोलीस क्राईम ब्रँचने पकडले !!
पिस्तूल मॅक्झिन व जिवंत काडतुसे मुंबई पोलीस क्राईम ब्रँचने पकडले !!
गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्फत पायधुनी परीसरात विनापरवाना बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र व काडतुसे विक्रीकरीता आलेल्या ०५ इसमांना ताब्यात घेण्यात आले.
खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, काही इसम पायधुनी परीसरात विनापरवाना बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र व काडतुसे विक्रीकरीता येणार आहेत. प्राप्त माहितीची शहानीशा केली असता, हॉटेल अॅलीगंट, रुम नं. ३०५, नारायण ध्रुव स्ट्रिट, पायधुनी, मुंबई या ठिकाणी खंडणी विरोधी कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला असता, सदर ठिकाणी ०५ इसम मिळुन आले. त्यांच्या ताब्यात ०३ पिस्टल मॅगझीनसह, ०३ मॅगझीन व २१ जिवंत काडतुसे मिळून आली.
त्यांच्याकडे मिळुन आलेल्या अग्निशस्त्र व काडतुसे यांच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. त्यांच्या ताब्यात मिळुन आलेली अग्निशस्त्रे व काडतुसे त्यांनी विक्रीकरीता आणल्याचे सांगितले. सदर बाबत पायधुनी पोलीस ठाणेस वि.स्था. खं.क्र. ४८८/२०२६ कलम ३,२५ हत्यार कायदा सह कलम ३७ (१) (अ), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याची गुन्हे शाखेमध्ये गुन्हे प्रशासकीय विभाग स्था.ख. क्र. ६८/२०२६ अन्वये पुर्न नोंद घेण्यात आली आहे. नोंद गुन्हयामध्ये खालील नमुद इसमांना अटक करण्यात आली आहे.
१) पुरुष वय २५ वर्षे राहणार राजस्थान, २) पुरुष वय २४ वर्षे राहणार राजस्थान, ३) पुरुष वय १९ वर्षे राहणार हरियाणा, ४) पुरुष वय २६ वर्षे राहणार राजस्थान, ५) पुरुष वय २५ वर्षे राहणार राजस्थान.
सदरची कामगीरी माननीय पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, माननीय पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, माननीय अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, माननीय पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त (डि विशेष) श्री. सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी प्रथकातील प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस निरीक्षक अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश पाटील व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडलेली आहे.