भग्न अवस्थेतील गणपती दर्शन !!
गणेशोत्सव, ईद ह्या सणांचा दुष्परिणाम होत आहेत. आताच्या गणेशोत्सवाचे व्यापारीकरण इव्हेंट, प्रसिद्धीच्या माध्यमातून नवसाला पावणाऱ्या लालबाग राजाला अनंत अंबानीने २० कोटी रु चा सोन्याचा मुकुट अर्पण केल्यामुळे मंडळाचे विश्वस्तपद देण्यात आले. राजा नवसाला पावतो म्हणून लाखो गणेशभक्त ८-८ तास रांगेत उभे राहून, दोन तीन सेकंद का होईना, दर्शन घेतात. परंतू गणेशभक्त हे विसरतात घरच्या गणेश चतुर्थीला गणपतीची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना पूजा उपासना करत असताना, घरच्या गणपतीवर विश्वास नाही का ? आपली श्रद्धापूर्वक केलेली पूजा पावन करून घेत नाही का? ई प्रकारे आता गल्ली बोळात, राजे महाराजे, गणेशोत्सव साजरे होत असल्यामुळे आणि विसर्जनच नव्हे तर राज्यकर्त्यांना कोणतेही निमित्त पाहिजे. त्यावेळी डीजे काय, ढोल ताशे काय, लेझर बिम इ चा वापर होत असतो. त्याला पोलीस करवाई करण्यात येत असता, नेते मंडळी दाद देत नाहीत. काय करायचे ते करा. पोलीस यंत्रणा तरी काय करणार.
आपण पाहताच आहोत की आजचा माणूस हतबल झाला आहे. देवाला शोधण्यासाठी कुठे कुठे जातो. पण श्रध्देने, भक्ती भावाने, स्वतःच्या आत्म्यामध्ये मात्र डोकावुन पाहात नाही. म्हणूनच कविने म्हटले आहे, कुठे शोधिसी मानवा, राउळी मंदिरी, नांदतो देव हा, आपल्या अंतरी. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. अशी आजच्या भक्त मंडळींची परिस्थिती आहे. त्यामुळे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र समुद्र किनाऱ्यांवर भग्न अवस्थेतील छोट्या मोठ्या मुर्ती पहावयास मिळतात. अशा मूर्तींचे पुन्हा समुद्रात विसर्जन करण्याकरीता किती गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होत असतात. हे दुर्दैव आहे. म्हणूनच नाईलाजास्तव विद्येची देवता गणेशा, "हेची मागणे ममका तपाला". असे म्हणावे लागते.