लोअरपरळ सन मिल गल्ली, खाद्य पदार्थ, फेरीवाल्यांना आंदण !!
लोअरपरळ सन मिल गल्ली, खाद्य पदार्थ, फेरीवाल्यांना आंदण !!
लोअरपरळ पश्चिम येथील सिताराम जाधव मार्ग, सनमिल गल्ली या परिसरातील खाद्य पदार्थ स्टॉल, कपडे चपलांचे फेरीवाले यांनी व्यापलेले असून, या परीसरात नवीन नवीन वसाहती, कार्यालये तसेच ट्रक, टेम्पो, वाहनांमुळे चिंचोळ्या सनमिल गल्लीत लोअर परळ, करी रोड स्टेशन कडे जाणाऱ्या येणाऱ्या जनतेची गैरसोय होत आहे.
रेल्वे स्टेशन पासून १५० मी परीसरात फेरीवाल्यांना मज्जाव असुन ही येथे कोणत्याही प्रकारे फेरीवाल्यांना मज्जाव नाही आहे. विशेष म्हणजे बेकायदा धंदा करणारे स्थानिक बेरोजगार नसून विभागा बाहेरील आहेत. यांना हटवण्याचे काम महापालिका आणि पोलीस यंत्रणाचे असून अर्थकारण आणि राजकारण मुळे त्यांना हाथ लावायची हिंमत होत नसावी. लोकप्रतिनिधींचे अतिक्रमण कडे लक्ष जात नाही हे दुर्दैव आहे. अशा प्रकारे सनमिल गल्ली फेरीवाल्यांना आंदण दिली आहे.