आते - जाते हुए मै सब पे नजर रखता हुँ.. नाम अब्दुल है मेरा. . .

आते - जाते हुए मै सब पे नजर रखता हुँ.. नाम अब्दुल है मेरा. . .

   रोड क्राॕस करुन पीटर वरिल गाणे म्हणत शैला पान शाॕप च्या टपरी वर आला..

" अरे भैय्या , एक गोल्ड फ्लेक दे ना " 

सिगारेट घेतली आणि ती पेटवून मस्त झुरके मारत बाजूला थांबला .


टपरीवर इतर अन्य दोन इसम होते . त्यांची पानाची आॕर्डर होती .

' अरे जल्दी दे ना भैय्या..'  त्यातल्या एका प्रौढ इसमाने त्याची घाई दाखवली. . .

पान घेऊन तो प्रौढ इसम सोबतच्या साथिदाराला बोलला..

' चल..जल्दी खिसक ले यहाँ से । गाडी में माल वैसा ही पडेला है । छुपा के रखा है मगर कोई लफडा नही माँगता ! ' 


तो जसा ही बोलला , इकडे पीटर चे कान टवकारले .

त्याने कानोसा घेतला आणि त्याची खात्री होताच . . .


पेल्हार पोलिस ठाणे .

दिः ०३ / ०४ / २०२४  सहाय्यक पो नि सोपान पाटील आपल्या टेबलावरच्या फाईल  चा अभ्यास करत बसले होते .

तितक्यात त्यांचा मोबाईल खणखणला. . .

" बोल पीटर..क्या कोई खबर मिली है तुझे  ? " 

पाटील साहेब पीटर शी फोन वर बोलत होते . संभाषणा दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर चे भाव बदलले .

फोन जसा ही संपला ताबडतोब पाटील साहेबांनी पीटर नी सांगितलेली गुप्त माहिती पेल्हार पोलिस ठाणे चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री जितेंद्र वनकोटी साहेब यांना दिली .

वनकोटी साहेबांनी त्वरित त्यांच्या पथकाला पाटील साहेबांना पीटर कडून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळणीचे आदेश दिले. 


गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स पो नि सोपान पाटील , पो उप. नि तुकाराम भोपळे आणि इतर पोलिस कर्मचारी ठरलेल्या योजने नुसार आपला वेष बदलून मुख्य रस्त्यावर सज्ज झाले..


पीटर नी दिलेल्या माहिती नुसार सस्त्यावरच्या प्रत्येक अॕटो रिक्षावर सगळ्या पथकाची भेदक नजर फिरत होती .

अचानक पीटर नी दिलेल्या क्रमांकाची रिक्षा दिसली ..

आणि पाटील साहेबांनी ती रिक्षा थांबवली. .


' अरे भाई थोडा आगे जाना है..सवारी लोगे क्या ' असे विचारले.

 प्रौढ इसम रिक्षा चालवित होता आणि मागे एक तरूण मुलगा बसलेला होता.

" रिक्षा खाली नही है भाई..अंदर सवारी बैठेली है " असे बोलत तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता.

तितक्यातच भोपळे साहेब आणि इतर सहकारी कर्मचारी अॕटो जवळ येऊन अॕटो चालकाला आणि मागच्या तरुणास ताब्यात घेतले.


१) पोखन परण साव 

वय वर्ष ५० रिक्षा चालक रा .नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर.


२) अब्दुल मुबारक अली शाह उर्फ बड्डा 

वय वर्ष २३  व्यवसाय चालक

रा. नालासोपारा पूर्व

ता. वसई जि. पालघर.

अश्या परिचयाचे ते दोन व्यक्ती होते.

त्या दोघांना त्याब्यात घेऊन रितसर पंचनामा केल्या नंतर झडती घेतली असता , एक अॕटो रिक्षा , तलवार , आणि एक धारदार सुरा तथा एक मोबाईल फोन सापडला व त्याची जप्ती करण्यात आली.


सदर घटने बाबत त्यांच्या विरूध्द पेल्हार पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर ३७७ / २०२४ , भारतीय हत्यार कायदा कलम ४ , २५ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . दोन्ही आरोपींना पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले आणि पुढील तपास सुरू झाला.


सकिना बानो ( कायदेशिर नाव बदलून..)

वकील अहमद बादशाह अहमद इद्दिसी याची पत्नी.

रहाणार नायगाव.

पती वकील अहमद कामाला गेल्या नंतर प्रपंचाचा बाजारहाट कलाण्यासाठी नेहमी बाहेर जात असे.. जाता येता रिक्षा चालक पोखन परण साव ची ओळख झाली..नेहमीच जाणे येणे असल्या कारणे ओळख वाढली..दिलखुलास मैत्रीत बोलणे सुरू झाले.

मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले .. भेटीगाठी वाढल्या गुलछर्रे उडवणे होऊ लागले.

मग फोनवर तासन् तास बोलणे फोटो शेअर करणे नित्याचे झाले.

प्रारंभी पती कामाला गेला की सकिना ( नाव बदलून..) आणि पोखन एकमेकांशी भेटत असत .  पती घरी येण्याच्या सुमारास ती घरी परत यायची नंतर मग मोबाईल वर प्रेम आलाप रंगत असे.


आपल्या बायको च्या वागण्यात कांहितरी बदल झालेला वकील अहमद यास लक्षात आले .तो तिच्यावर पाळत ठेऊ लागला . कामावरून तो कधी अवेळी घरी येऊ लागला.

सकिना च्या लक्षात आले की आपल्या नव-याला आपली शंका येत आहे आणि ही घटना ती एके दिवशी पोखन ला भेटण्यासाठी गेल्यावर सांगून दिली.


इकडे पोखन ला अक्षरशः सकिनाचे जणू वेड लागले होते. 

एखाद्या व्यक्ती ची सवय लागली की , त्या व्यक्ती विना कुठेच मन लागत नसते.

पोखन चे ही तसेच झाले.

परिणामी भेटी गाठी , गुलछर्रे वगैरे कमी होत चालल्या तसा पोखन सैराभेर झाला.

त्याच्या मनात सारखा विचार येत असे की , परिस्थिती पूर्वप्रत होण्यासाठी कांहितरी ठोस उपाय अथवा बंदोबस्त केलाच पाहिजे ! 


त्याने योजना तयार केली . योजने बाबत त्याच्या इतर दोन साथिदाराला ही समजावून सांगितले.

अब्दुल मुबारक अली शाह उर्फ बड्डा , अन्य साथिदार इमरान इब्राहिम सिध्दिकी हे ही तयार झाले.


रात्रीचे १० . ३० वाजलेले..

वकील अहमद घरी जाण्यास निघालेला.. तो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०८ येथे श्री कृष्ण हाॕटेल जवळ उभा होता .

तितक्यात तिथे एक अॕटो येतो . दोन साथिदार अॕटोतून खाली उतरतात..आणि वकील अहमद यास जबरदस्तीने बसवतात आणि याच महामार्गाच्या कडेला बाफाने गावाची हद्द ता. वसई जि. पालघर कडे घेऊन जातात.


आता, 

अॕटो रिक्षा क्रमांक एम एच ४७ एक्स १९२८ यात मागच्या सीट वर मधोमध वकील अहमद ला बसविण्यात आले.

अॕटो चालकाला पहाताच, 

' मै तेरे कू पहचाना है । मेरी शादीशुदा जिंदगी तू खराब कर रहा है..' असे वकील अहमद बोलला.

चालू अॕटो मध्ये वकील अहमद ला शिव्या देणे दमदाटी करणे चालू झाले..नंतर पुढे दोन साथिदार त्याला मारू लागले.

चलत्या अॕटोतून उतरून पळून जायला सुध्दा वकील अहमद ला जमेनासे झाले.

त्याचा प्रतिकार क्षीण होत गेला तसा एकाने त्याचा गळा आवळला तर दुसऱ्या साथिदाराने डिओ गाडीची चावी त्याच्या मानेत भोसकून त्याचा जीव घेतला. . .! 


वकील अहमद जीवे मारल्या गेल्याची खात्री होताच अॕटोत असलेले तिघे ही खाली उतरले.

अंधाराचा फायदा घेत त्याचा मृतदेह मौजे भालीवली गावाच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०८ गुजरात वाहिनी लगत एका खड्ड्यात फेकून देऊन तिघे पसार झाले . . .


साधारण सकाळची वेळ..

हळुहळू मुंबई चा वेग वाढत चाललेला..प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी कामाला निघालेला..

कांही पाचचा-यांना भालीवली परिसरात उग्र वास येत होता..लोकं नाकाला रुमाल बांधून ये - जा करत होते . . .

दुसऱ्या दिवशी ही तोच उग्र वास .आज भयानक उग्र दर्प वाढलेला होता..

न रहावून एक पादचारी ज्या दिशेकडून वास येऊ लागला तिथे पोहंचला.

अचानक त्याचा थरकाप वाढला..दरदरून घाम सुटला..बोबडी वळाली.

' खून..ख ख् खून 

म..मा..माणूस मेलेला आहे त..ते त्या ठिकाणी ' 

खून..खून..खून ' 

तो आरडा ओरडा करू लागला.

दरम्यान तिथे गर्दी जमली..कुजबूज वाढली.

कुण्यातरी एकाने विरार पोलिस ठाणे  येथे फोन लावून सदरिल घटनेची माहिती दिली.

विरार पोलिस कर्मचाऱ्यांना दिः ०६ / ०९ / २०२१ रोजी कुजलेल्या आवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह मिळाला आणि त्याची रितसर अकस्मात मृत्यू रजि. क्रमांक १८७ / २०२१ सी आर पी सी १७४ प्रमाणे नोंदविण्यात आला.

तसेच वकील अहमद ही व्यक्ती हरवल्या बाबत ची शिकायत वालीव पोलिस ठाणे येथे मनुष्य मिसिंग रजि. नंबर २४७ / २०२१ प्रमाणे नोंदविलेली ही होती.


पीटर यानी दिलेल्या खबरी नुसार पकडण्यात आलेल्या 

१) पोखन परण साव

२) अब्दुल मुबारक अली शाह

३) इमरान इब्राहिम सिध्दिकी

या तीन आरोपींची कसून आणि कुशलतेने चौकशी केली असता सदरिल आरोपीनी मयत वकील अहमद यास जबरदस्तीने अॕटो मध्ये बसवलेली जागा आणि अॕटो मध्येच त्याचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची जागा दाखविली अशी माहिती पेल्हार पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने माननिय जितेंद्र वनकोटी साहेबांना दिली.


आरोपी पोखन परण साव यास पोलिसी खाक्या दाखविताच अजून एक आश्चर्य कारक माहिती समोर अशी आली की , सकिना बानो ( नाव बदलून..) सोबत चे पोखन चे संबंध दुरावल्या नंतर त्या महिलेचे सूत विक्रम गुप्ता नावाच्या इसमाशी जुळलेले होते.

हा पोखन पठ्ठ्या त्या विक्रम गुप्ता च्या ही खूनाचा कट रचून होता . पण तो पूर्ण झाला नाही.

पीटर नी दिलेल्या अॕटो मधल्या शस्त्रा संबधीची माहितीचा अभ्यास पहाता कदाचित् ती तलवार तो धारदार सुरा कदाचित् विक्रम गुप्ताला ठार करण्या साठी तर नव्हता. . .? ? ? 


सदर घटने बाबत विरार पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर २८१ / २०२४ भा द वि सं कलम ३०२ , ३६४ , २०१ , ५०४ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि सदर गुन्हातले तीन ही आरोपी पेल्हार पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले.


सदरिल गुंतागुंतीची आणि कुशलतेची कामगिरी  मा. पोलिस आयुक्त श्री मधुकर पाण्डेय , अप्पर पो आयु श्री  श्रीकांत पाठक मिरा - भाईदर वसई विरार पोलिस आयुक्तालय श्री जयंत बजबळे , पोलिस उप आयु साहेब परिमंडळ - ३ विरार , श्री बजरंग देसाई , सहाय्यक पो आयु विरार यांचे मार्गदर्शना खाली श्री जितेंद्र वनकोटी , वरिष्ठ पोलिस निरिक्षक साहेब श्री कुमारगौरव धाकवड , पोलिस नि ( गुन्हा ) श्री शकील शेख पो नि ( प्रशासन ) व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स पो नि सोपान पाटील , पो उप नि तुकाराम भोपळे , पो हवा. योगेश देशमुख , तानाजी चव्हाण , अनिल शेगर , वाल्मिक पाटील , पो अं मिथुन मोहिते , रवि वानखेडे , संजय मासाळ , किरण आव्हाड ,  राहुल कर्पे , निखिल मांडलिक , दिलदार शेख , अनिल साबळे , शरद राठोड , सुजय पाटील , सर्व पेल्हार पोलिस ठाणे , पो हवा नामदेव ढोणे , पो अं सोहेल शेख नामे पो उप आयुक्त कार्यालय परिमंडळ - ३ या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वर सोपविण्यात आलेल्या जबाबदारी नुसार यशस्वी रित्या पार पाडली.

(प्रद्युम्न देशपांडे 

जालना)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week