
मतदान नाही तर सुट्टी नाही !!
निवडणूक आयुक्ता तर्फे मतदानवाढीसाठी आव्हान करण्यात येते. त्याप्रमाणे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. लोकशाहीत मतदान करणे हे परम कर्तव्य आहे. उमेदवार, पक्ष संघटना, युती आघाडी लायक नसल्यास (मतदाराच्या दृष्टीने) परंतु मतदानाचा हक्क बजावण्यास हवा. जे मतदान करणार नाहीत, त्यांची सुट्टी रद्द करावी. मतदान केल्याचा पुरावा म्हणून, बोटावर शाईची खूण असते. त्यामुळे मतदान केले की नाही ते समजू शकते. त्यामुळे मतदानही जास्त प्रमाणात होऊ शकेल. त्याकरीता मतदान नाही तर सुट्टी नाही, असे निवडणूक आयुक्तांनी जाहीर करावे.