वसई भाईंदर जलवाहतूक (रो-रो) सेवा आजपासून सुरू !!

वसई भाईंदर जलवाहतूक (रो-रो) सेवा आजपासून सुरू !!

   मागील आठवड्यापासून तांत्रिक अडचणीत सापडलेली भाईंदर रोरो सेवा अखेर २० फ्रेब्रुवरी मंगळवार पासून सुरू झाली. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली व तत्कालीन जलवाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जलवाहतूक सेवा वाढविण्याकरीता सागरमाला प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पा अंतर्गत वसई ते भाईंदर रो रो सेवा सुरू करण्यात आलेली आहे. अशी माहिती भाजपाचे विधानसभा प्रमुख मनोज पाटील यांनी दिली.

      २०१७ पासून या प्रकल्पाचे काम सुरू होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला होता आता ही सेवा सुरू होत असल्याने सर्वांना आनंद झालेला आहे. या प्रकल्पाची संकल्पनाच येण्यास उशीर झाला आहे. याआधी घोडबंदर रोडला वळसा घालून भाईंदरला जावे लागत होते. परंतु आता भाईंदर पश्चिम ते दहिसर चेक नाका पर्यंतचा प्रवास सोपा झालेला आहे.

      ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व विद्यमान जलवाहतूक मंत्री सर्व आनंद सोनवाल यांचे मनोज पाटील यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावरच रोरो सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वसई भाईंदर येथील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे गौरव सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्या मार्फत ही सेवा चालवली जाणार आहे. जानवी या फेरबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी अशी असणार आहे. या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली आहे.

      मात्र जेटीची सर्व कामे महाराष्ट्र सागरी महामंडळाने पूर्ण केलेली आहेत. फेरबोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत असली तरी वाहतूक कोंडीचा सामना करत वसई ते भाईंदर प्रवास करणाऱ्या नागरिकांची वेळ व इंधन बचत करणारा पर्यावरण स्नेही आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा प्रवास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जनतेसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल. सध्या वसई भाईंदर प्रवास करणार्याना लोकल गर्दी महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे रो रो सेवा सुरू झाल्याने काही मिनिटातच वसई ते भाईंदर प्रवास हा सोयीचा होणार आहे. दररोज ही फेरबोट सकाळी पावणे सात ते संध्याकाळी साडेसात पर्यंत दिली जाणार आहे. भरतीच्या वेळी कमी अंतराच्या पूर्वी निश्चित केलेला ०.८ सागरीमैल अंतर असल्याने प्रवास वेळ कमी लागणार आहे. तर अहोटीच्या वेळेला दोन मैल सागरी अंतरचा मार्ग लागेल. असे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून सांगण्यात आले आहे.


Batmikar
कार्यकारी संपादक - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week