शुभंकरोती साहित्य मंडळातर्फे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन धुळे येथे होणार !!!
शुभंकरोती साहित्य मंडळातर्फे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन धुळे येथे होणार !!!
आजकल नेटचा जमाना आहे. सोशल मीडियावर अनेक साहित्यिक आपलं साहित्य प्रकाशित करत असतात कारण बरेचसे साहित्यिक नवोदित कवी यांना कुठल्याही अंकामध्ये अथवा कुठल्या एखाद्या पुस्तकातून लेख, कविता प्रसिद्ध करण्याची संधी मिळत नाही. परंतु अजूनही असे काही साहित्यिक आहेत कि ते साहित्यावर जीवापाड प्रेम करीत असतात. साहित्यासाठी धडपडत असतात, ज्येष्ठ साहित्यिकांसोबत नवोदित कवी लेखकांना प्रोत्साहन देत असतात, आणि त्यासाठी स्वतः का असेना साहित्य संमेलन भरवत असतात.
अशाच एक ज्येष्ठ साहित्यप्रेमी साहित्यिका सौ सोनाली जगताप यांनी धुळे येथे राज्यस्तरीय पहिले साहित्य संमेलन घेण्याचे आयोजन केलेले आहे.
शुभम करोति साहित्य मंडळातर्फे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन दिनांक एक फेब्रुवारी रोजी धुळे येथे संपन्न होणार आहे.
खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या "मन वढाय वढाय" या ओवीच्या अनुषंगाने पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे....
गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते नऊ ग्रंथ दिंडी पासून कार्यक्रमाची सुरुवात होईल सकाळी चहापानानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा उद्घाटन स्वागत समारंभ करण्यात येईल. निमंत्रित मान्यवरांतर्फे कार्यक्रमाची रूपरेषा व कार्यक्रमास सहभागी होणाऱ्या सर्व साहित्यिकांचे परिचय देण्यात येतील.
मान्यवरांचे भाषणानंतर जीवन गौरव पुरस्कार सोहळा तसेच, पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पाडण्यात येईल. दुपारीच्या जेवणानंतर कार्यक्रमाच्या द्वितीय सत्राला सुरुवात होईल. द्वितीय सत्रामध्ये प्रामुख्याने शिट्टी वादनाचा कार्यक्रम तसेच गझल मुशायरा, कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. एक मुलाकात या सदरामध्ये माननीय विद्यावाचस्पती डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यांची मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे तसेच गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष पद यशवंत देशमुख हे भूषवणार आहेत कवी संमेलनाचे अध्यक्ष पद माननीय पत्रकार पंकज दळवी मुंबई हे भूषविणार आहेत. तसेच शैलजा देशपांडे यांचे अभिवाचन होईल.
साहित्य संमेलन एकदिवसीय असेल, पालट स्मृती आय एम ए हॉल, गरुड वाचनालया शेजारी धुळे येथे दिनांक एक फेब्रुवारी 2024 , वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत घेण्यात येईल असे संमेलनाच्या आयोजिका सोनाली जगताप यांनी संमेलनाची माहिती देताना सांगितले.
तसेच आमच्या बातमीकार या डिजिटल वृत्तपत्र टीमला संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. याबद्दल सौ. सोनाली जगताप यांना बातमीकार तर्फे संपादक अभिषेक शिंदे यांनी खूप खूप संमेलनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.