
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - १२५ व्या जन्मदिनानिमित्त वरळी नाका येथील त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ अभिवादन !!
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - १२५ व्या जन्मदिनानिमित्त वरळी नाका येथील त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ अभिवादन !!
महाराष्ट्र संरक्षण संघटना या मराठी माणसांच्या हितासाठी झटणाऱ्या बिगर राजकीय चळवळीच्या वतीने आणि अत्रे स्मारक समिती मुंबई यांच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू तसेच महाराष्ट्र राज्य स्थापनेचे शिल्पकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना त्यांच्या १२५ व्या जन्मदिनानिमित्त वरळी नाका येथील त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते, माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, आमदार सचिन अहिर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, अत्रे समितीचे अध्यक्ष ॲड. आरती पुरंदरे-सदावर्ते, रिलायन्स समूहाचे उपाध्यक्ष रवींद्र आवटी, महाराष्ट्र संरक्षण संघटना मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत मयेकर, पत्रकार आबा माळकर, आचार्य अत्रे यांच्या नातसून ॲड. पै, अत्रे यांचे पणतू अक्षय पै, कुटुंब रंगले काव्यात चे निर्माते विसुभाऊ बापट, अत्रे समितीचे सदस्य सर्वश्री अरविंद भोसले, ॲड. तेंडुलकर, मोहन म्हामुणकर, विजय कदम, दीपक गुंडये, राजन देसाई, ॲड.अभ्यंकर, आदी मान्यवर उपस्थित होते.